-->
आरोग्यकरमाळाविशेषसामाजिक

मित्राच्या मदतीसाठी धावून आला २५ वर्षांपूर्वीचा मित्र परिवार

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील साडे येथील रहिवासी श्री. बापुराव अवताडे यांच्या मुलाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला एक महिन्यापूर्वी बार्शी येथील डॉ. पडवळ साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलावर डॉ. पडवळ साहेबांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली व नंतर मुलाला घरी सोडण्यात आले. यानंतर त्या मुलाची पुन्हा एकदा छोटीशी शस्त्रक्रिया होणार आहे. असे श्री. बापुराव आवताडे यांच्या मित्र परिवाराला समजताच त्यांनी सर्वांना आवाहन करुन मित्राला मदत म्हणून तीस हजार रुपयांचा धनादेश अवताडे यांचेकडे सुपूर्द केला.

साडे हायस्कूल, साडे येथील १९९६ मधील इयत्ता दहावी बॅचच्या सर्व मित्र परिवारांना ग्रुप मधील मा. श्री. गणेश आडेकर यांनी आवाहन केल्यानंतर सर्व मित्र परिवारांनी प्रतिसाद दिला. सर्वांनी मिळून ग्रुप मधील बापुराव आवताडे यांना मुलांच्या पुढिल उपचारासाठी अनमोल मदत केली. ३०,०००/- रुपयाचा धनादेश श्री. अवताडे यांच्या साडे येथील निवासस्थानी जाऊन दिला. या कौतुकास्पद कामाचा साडे परिसरात तसेच तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरत असून या सर्व मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मदतीसाठी API सभांजी तागड साहेब, गणेश आडेकर, सारीका पाटील, निता आरळकर, सुनिल पवार, रमेश शेलार, दादासाहेब ढवळे, तुकाराम फरतडे, तानाजी सरवदे, प्रशांत शिंदे, अशोक ठक्कर, नागेश गोसावी, महादेव सुपेकर, प्रमोद शिंदे, अविनाश वळेकर, हरीश अरणकल्ले, पानीत घाडगे, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र लोंढे, शहाजी वाघ, आत्माराम गोमे, रमेश सुरवसे, शिवाजी दळवी, एस.पी. राऊत, समीर अरणकल्ले, ललित कदम, अमोल राऊत, तुकाराम पिसे, राणी ढवळे, अनिता वरडोळे, गीता गायकवाड, मैना अवताडे (सरडे) निता माने यांनी एकत्र येऊन मित्रासाठी अनमोल मदत केल्याबद्दल श्री. बापुराव अवताडे यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close