केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाची यात्रा दिनांक ०१ ते ०५ मार्च दरम्यान होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे यानी दिली.
या कार्यक्रमामध्ये मंगळवार दिनांक ०१ मार्च रोजी महाशिवरात्री असून या दिवशी सकाळी ०९:०० ते ११:०० शिवलिला ग्रंथ पारायण व दिवसभर धार्मिक विधी तर रात्री ०९:०० ते ११:०० या वेळेत ह.भ.प. थिटे महाराज यांचे सुश्राव्य असे कीर्तन होणार आहे. मध्यरात्री १२:२६ नंतर निशीधकाली शिवलिंगास लघु रूद्राभिषेक करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक ०२ मार्च रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० शिवलिला ग्रंथ पारायण व शिवलिंगाला नैवेद्य व भोजन तसेच रात्री ०९:०० ते ११:०० या वेळेत ह.भ.प. गणेश भोरे महाराज यांचे कीर्तन व जागर होणार आहे. तसेच गुरूवार दिनांक ०३ मार्च रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० या वेळेत शिवलिला ग्रंथ पारायण व सांगता दुपारी शिवलिंगास लघु रूद्राभिषेक व भोजन तर रात्री ०९:०० ते ११:०० या वेळेत ह.भ.प. रवि महाराज सोयेगाव यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवार दिनांक ०४ मार्च रोजी शिवलिंगास लघु रूद्राभिषेक व धार्मिक विधी तर रात्री १२:०५ नंतर श्रीचा भव्य असा छबीना निघणार आहे. या छबीन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे. तसेच शनिवार दिनांक ०५ मार्च रोजी दुपारी ०१:०० नंतर मल्लाच्या जंगी कुस्त्या होणार आहेत. या कुस्त्यांसाठी नामवंत पैलवानाची ऊपस्थिती राहणार आहे. या यात्रेमध्ये यात्रेकरुनी कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यात्रा परिसरात कोणीहि डिजीटल बॅनर लावू नयेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.




