-->
करमाळाकृषी विषयकमाहिती विषयकविशेष

Breaking: आदिनाथ बचावासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या ठेवी देण्याचे सभासदांचे आश्वासन

आदिनाथ सुरू करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत- हरिदास डांगे

 

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा कारखाना असून तो सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता सभासदांनी रक्कम उभा करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी माझे एक कोटी रुपयाचे योगदान कारखान्यासाठी देण्यास तयार असल्याचे साखर कारखान्यातील तज्ञ, आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री. हरिदास डांगे यांनी जाहीर केले.

 

 

यावेळी उपस्थित असलेले डॉ. वसंतराव पुंडे ५० लाख, प्रा. रामदास झोळ ५० लाख, धुळा भाऊ कोकरे ५० लाख, महेश चिवटे २५ लाख, प्रा. जयप्रकाश बिले १० लाख, रवींद्र गोडगे १० लाख, महेंद्र पाटील १० लाख, प्रा. शहाजीराव देशमुख १० लाख, डॉ. अमोल घाडगे १० लाख, अविनाश सरडे १० लाख, प्रा. शिवाजीराव बंडगर ५ लाख असे जवळपास मिळून साडेतीन कोटी रुपयांची निधी उपलब्ध करण्याचे आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या बैठकीत जाहीर केले.

 

 

यावेळी बोलताना हरिदास डांगे म्हणाले की, या रकमेची ठेव पावती कोणत्याही बँकेत करून ही पावती तारण ठेवण्यासाठी ना हरकत घेऊन यावरून यावर कर्ज उचलून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. जवळपास तीस कोटी रुपये उपलब्ध झाले तर कारखान्याचे चाक फिरून कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालून तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर होईल. राजकारण विरहित सर्वांनी एकत्रित यावे. या कामासाठी तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी ही मदत करावी. कर्मचाऱ्यांनीही परिस्थिती समजून दोन पाऊले मागे पुढे घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहान केले. मंगळवारी महाशिवरात्री दिवशी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी ११:०० वाजता सर्व कर्मचार्‍यांच्या भावना जाणून घेऊन पुढील रूपरेषा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी जमा होणाऱ्या रकमेचा वापर करण्यासाठी सह्यांचा अधिकार हरिदास डांगे यांना देण्याची एकमताने ठरले. ही रक्कम पूर्तता झाल्यानंतर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अर्थमंत्री अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी आदिनाथ बाजार समितीचे पदाधिकारी जाणार असल्याची माहिती डॉ. वसंत पुंडे यांनी दिली.

 

 

हरिदास डांगे यांनी अनेक कारखाने उभा करून सक्षमपणे चालवले आहेत. हरिदास डांगे यांचा शब्द आमचा कोणताही कामगार मोडणार नाही. महाशिवरात्री दिवशी सर्व कामगारांना विश्वासात घेऊन आदिनाथ सहकार तत्त्वावर चालविण्यासाठी सर्व कामगार कामाला लागतील असा मला विश्वास आहे.

अभिमन्यू देशमुख, अध्यक्ष आदिनाथ कामगार संघटना

 

 

 

या बैठकीसाठी आदिनाथ चे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे, संतोष पाटील, पोपटराव सरडे, सुदर्शन शेळके, रेवनसिद्ध झिंजाडे, पप्पू वाडेकर, भीमराव येडे, अण्णासाहेब सुपनर, राजेंद्र बेरे, नासीर कबीर, अमोल नरोटे, धनंजय शिंदे, श्रीराज घाडगे, मारुती रोंगे, अविनाश सरडे, अमरजीत साळुंके, संजय शिंदे, अनिल तेली आदीजण उपस्थित होते.

 

आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे तरच ऊस उत्पादक शेतकऱ्याला भावी काळात न्याय मिळणार आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी पश्चिम भागातून ऊस उत्पादक शेतकरी कोट्यवधी रुपये देण्यासाठी तयार आहेत पण विश्वास देणारा चेहरा पाहिजे होता आज हरिदास डांगे यांच्या रूपाने आदिनाथ आता चालू शकतो व प्रगती करू शकतो याचा विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे २५ ते ३० कोटी रुपये ठेवी गोळा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

धुळा भाऊ कोकरे 

 

माजी संचालक आदिनाथ कारखाना

 

 

हरिदास डांगे यांच्या अटी:-

▪️जो दोन कोटी रुपयांच्या ठेवी देईल त्याने संचालक पदाचा अर्ज भरावा.

▪️कारखान्याच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करू नये.

▪️जो कर्मचारी काम करेल त्याचाच पगार भावी काळात मिळेल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close