प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करणार असल्याचे मत मोरवड वि. का. से. सह. सोसायटीच्या बिनविरोध नवनियुक्त संचालिका शारदाताई काळे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मोरवड सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आलेल्या सौ. काळे पाटील या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे कार्यकरिणी सदस्य श्री. महेश काळे पाटील यांच्या मातोश्री आहेत. यावेळी अधिक बोलताना सौ. काळे पाटील म्हणाल्या कि, मला मोरवड वि.का.सह. सेवा सोसायटीवर बिनविरोध निवडून देवून सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी मोरवड ग्रामस्थ व सोसायटीच्या सभासदांची शतशः आभारी आहे.




