-->
करमाळाविशेषसामाजिक

महिला शिक्षिकांनी २ तासात सर केले कळसूबाई शिखर

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा व माढा तालुक्यातील महिला शिक्षिकांनी महाराष्ट्रातील, नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे विक्रमी वेळेत सर केले. स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप माढा करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा व माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षिकांनी दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ०४:०० ते ०६:०० या वेळेत कळसूबाई शिखर सर करण्याची ही मोहीम पूर्ण केली.

या महिला शिक्षकांचा होता सहभाग
यामध्ये सुरेखा गावडे चौरे, अनुपमा वनवे, शिल्पा कुलकर्णी, रुपाली भोसले, रोहिणी वीर, स्मिता कुंभार, अंबुताई इतापे, मोहिते मॅडम यांचा समावेश होता.

स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीनिवास मोहिते सर व भालचंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रेक पूर्ण करण्यात आला. आता पर्यंत या महिला ट्रेकर्सनी लोहगड, सरसगड, अजिंक्यतारा व वासोटा या किल्ल्यांची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close