प्रतिनीधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मौजे रावगाव येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कोविड-19 आपत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. तसेच कोरोना पासून बचाव होण्यासाठी कोरोना बाधितांना शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात सेवा देण्याचे कार्य असो किंवा कोरोना काळात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची थर्मामीटर द्वारे तपासणी असो. तसेच दर आठवड्याला अँटीजन आरटीपीसीआर टेस्ट करणे अशा विविध सेवा देण्याचे कार्य कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी केले याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य विलास काका मुळे हे होते. यावेळी मुळे बोलताना म्हणाले की, आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खूप मोठे योगदान रावगाव साठी दिलेले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे हे योग्यच आहे. प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, कोविड आपत्तीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान हे बहुमोल आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध सेवांच्या माध्यमातून कोरोनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावांमध्ये कोरोनाचा कमीत कमी शिरकाव झाला. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. संजय बुधवंत, डॉ. राहुल जाधव, अपेक्षा शिंदे, समुदाय अधिकारी केसकर मॅडम, सी. एस. तळपाडे मॅडम, डी. ए. डोळस, पी. एन. बर्डे, दिपाली भवाळ, छाया विनोद पवार, अश्विनी हनुमंत बरडे, आशा अशोक जांभळे, कल्पना गणेश राख, सारिका नवनाथ बागडे, गवळा सोमनाथ भारती आदी आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बरडे गुरुजी यांनी केले. तर प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी मांडले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या अविदा (ताई )कांबळे, सुरेश केकान, हनुमंत बरडे, प्रल्हाद कांबळे, अक्षय पवार, लखन पवार, विजय पवार, राजू पवार, गणेश पवार, राजेंद्र कोळेकर, आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.



