-->
करमाळाविशेषसामाजिक

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये स्वराज प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद भिल यांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रसाद भिल यांचा मानस आहे की, विद्यार्थ्यांच्या कला गुंणांना वाव देण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविले पाहिजेत. यामुळे विद्यार्थी नक्कीच आदर्श नागरिक बनल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून लगेच त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये

पहिला क्रमांक शिवानी लहू होरे (ई. ०९ वी),

दुसरा क्रमांक नूतन राजेंद्र जगताप (ई. ०७ वी),

तिसरा क्रमांक तुषार धनाजी हनपुढे (ई. ०८ वी)

या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.

 

ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण मंडळ, गौडरे या संस्थेचे सचिव मा. हरिदास काळे व शाळेचे मुख्याध्यपक बापू निळ, उत्तम हनपुडे सर, यशवंत कोळेकर सर, वैजिनाथ भोईटे सर, अशोक जावळे सर, इंद्रजीत मुळीक सर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संदीप काळे, जयवंत आंबारे विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांचे आभार हनपुडे सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close