प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील हजारो रुग्णांना आर्थिक मदत करून एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. असे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करमाळा येथे गरजू १०० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका गायकवाड, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अण्णा सुपनर, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अशोक नरसाळे, नासीर कबीर, सहकार अधिकारी मोरे, शिवसेनेचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, समीर हलवाई, युवा सेना तालुका प्रमुख विशाल गायकवाड, सागर गायकवाड, दादा पाटील, पप्पू मस्के आदीजण उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महेश चिवटे म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणजे अनाथांचा नाथ असून त्यांच्याकडे मदत मागण्यास जाणारा कोणी मोकळ्या हाताने परत येत नाही. विशेषता कोणाला वैद्यकीय मदत लागली तर एकनाथ शिंदे सढळ हाताने त्याला मदत करतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी १५० अद्यावत रुग्णवाहिका मोफत दिल्या आहेत. करमाळा तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका दिली असून कोरोना काळात २२० रेडी सर इंजेक्शन मोफत दिले. अनेक रुग्णांना आर्थिक मदत केली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे १३० हृदयावर छिद्र असणाऱ्या लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आज करमाळा येथे सुद्धा ज्या महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत नाही. अशा महिलांचे अर्ज भरून घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आले. तसेच आज सकाळी शिवसैनिकांच्या वतीने श्री कमला भवानी देवी येथे एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून महाआरती करण्यात आली.



