प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून राज्यात नवीन हायमास्ट दिवे बसऊ नयेत अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यापूर्वी राज्यभरांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये त्या-त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी हायमास्ट दिवे बसवणे विषयी आलेले प्रस्ताव मान्यतेसाठी दिलेले होते. त्या प्रस्तावांना मान्यता मिळालेली होती. परंतु कार्यारंभ आदेश देणे बाकी होते. अशा हायमास्ट दिव्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
त्यामुळे आ. संजयमामा शिंदे यांनी दि. १२ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मंजूर असलेले हायमास्ट दिवे बसविण्यात यावेत अशी मागणी केली होती. सदर मागणीचा विचार करून ग्रामविकास विभागातर्फे सुधारित अध्यादेश काढण्यात आलेला असल्यामुळे ग्रामीण भागात हायमास्ट दिवे बसविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
करमाळा तालुक्यातील ७० गावामध्ये या आर्थिक वर्षात ८० लाख रुपये किंमतीचे हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहे. सदर दिव्यांच्या मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असून फक्त कार्यारंभ आदेश मिळवून सदर दिवे बसविण्याचे काम बाकी आहे. आमदार शिंदे यांच्यामुळे गावागावात हायमास दिवे बसवण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.




