-->
देशराज्य

एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; प्रवाशांच्या आरडाओरड्याने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ!

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. आग लागल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुले घाबरून गेली होती. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. गाडी स्टेशन जवळ आलेली असल्यामुळे एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजले असले तरी, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

 

 

आज सकाळी गांधीधाम पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात येत असताना अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणीच आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने प्रवाशी हादरून गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. आगीची माहिती मिळताच मोटरमननेही गाडी थांबवली. त्यामुळे प्रवाशांनी गाडीत सामान टाकून तात्काळ गाडीतून उड्या मारत स्वत:ची सुटका करून घेतली.

 

 

यावेळी रेल्वेचे कर्मचारी, जवान आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांना बाहेर काढले. मात्र, आग विझवण्यासाठी रेल्वेकडे कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांना काहीच करता आले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे दोन्ही डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सध्या आगीवर नियंत्रण आणलं जात आहे. तसेच त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close