-->
करमाळासामाजिक

शिक्षकांचा सन्मान हाच आमचा अभिमान-अतुल भाऊ पाटील

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या कर्तुत्वाने होणे ही आमच्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या हातून उत्कृष्ट विद्यार्थी घडावेत व त्यातून तुम्हा शिक्षकांचा झालेला सन्मान ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे सभापती श्री. अतुल भाऊ पाटील यांनी कंदर केंद्राच्या शिक्षण परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले.

माहे सप्टेंबर २०२१ ची कंदर केंद्राची ऑफलाईन शिक्षण परिषद कोरोनो बाबतचे नियम पाळून श्री. अजित दादा पवार विद्यालय, वडशिवणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती अतुल भाऊ पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब, विस्तार अधिकारी श्री. अनिल बदे साहेब, केंद्र प्रमुख श्री. साईनाथ देवकर साहेब, मुख्याध्यापखक श्री. भोसले सर, श्री. फंड सर सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

या शिक्षण परिषदे मध्ये प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री. साईनाथ देवकर यांनी केले. गटशिक्षणाधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब, श्री. अनिल बदे साहेब, श्री. सखाराम राऊत, श्री. शहाजी बादल, श्री. रमेश कोडलिंगे, श्री. अनंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वडशिवणे, सातोली, पन्हाळकर वस्ती, पुनर्वसन कंदर, पांगरे या शाळांचा सन्मान सभापती अतुल भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी केंद्रप्रमुख श्री. साईनाथ देवकर यांच्या तर्फे उत्कृष्ट शाळांना बक्षिस देण्यात आले. लोकमंगल पतसंस्थेचा पुरस्कार मिळाले बद्दल श्रीमती रत्नमाला होरणे यांचा सत्कार करण्यात आला. विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. या शिक्षण परिषदेमध्ये सुत्रसंचालन श्री. अतुल घोगरे सर यांनी केले तर आभार श्री. भास्कर खुपसे सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close