-->
करमाळाविशेषसामाजिक

कुर्डूवाडी पंचायत समितीला ‘जनशक्ती’चा दणका; तब्बल २९ अधिकारी व कर्मचारी बिनपगारी

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्वसामान्य व गरजूंच्या कामानिमित्त जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे- पाटील गेले असता त्या ठिकाणी अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर दिसले. त्यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना कामावर उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी करायला लावली होती. या घटनेला एक वर्ष होतंय न होतंय तोच एका शेतकऱ्यांच्या कामासाठी अतुल खूपसे पाटील कुर्डुवाडी पंचायत समिती मध्ये गेले असता त्याठिकाणी अवघे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित असल्याने आज पुन्हा एकदा जनशक्ती ने कुर्डूवाडी पंचायत समितीला दणका दिला असून तब्बल २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिनपगारी कारवाई केली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील एका शेतकऱ्याच्या कामानिमित्त कुर्डुवाडी पंचायत समितीच्या कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी स्वतः गट विकास अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी हजेरी पत्रक व फिरती नोंदवही पाहिल्यानंतर सोमवार व गुरुवार मुख्यालय दिवस असतानाही सुमारे ४२ पैकी तब्बल ३० कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

 

 

दरम्यान गट विकास अधिकारी यांना कोरोना झाल्याने ते रजेवर असल्याने इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या बिन पगारी करा असा अट्टाहास अतुल खूपसे पाटील यांनी केल्यानंतर कार्यालयीन प्रशासकीय प्रमुख यांनी सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वर बिन पगारी कारवाई केली.

▪️हेच ते गैरहजर असणारे कर्मचारी..
बांधकाम विभाग बी.व्ही. रेपाळ, आर.व्ही. डेंगळे, एम.आर. मुस्ती, एम.एम. जवळकोटे, के.एस. खटके, डी.बी. पवार सर्व कनिष्ठ अभियंता, एस.एस. जाधव, कनिष्ठ सहा, ग्रामीण पाणी पाणीपुरवठा आर.एम काशीद, डी.बी. वाघमारे कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धनचे आर. वाय. थिटे, व्ही.जी. नेमाने पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य विभाग ए.डी. कुंभार, एस.ए. होनराव, डी.डी. चव्हाण, एन.बी. माळी, आरोग्य सेवक एस.ए. देवधरे, ए.व्ही. गौडरे, शिक्षण विभागाचे बी.एस. शिंदे, एकात्मिक बाल विकासचे के.एम. काळे, आर.यु. शिंदे, विस्तार अधिकारी पी.आर. लोंढे, डी.बी. मराठे, ए.बी. ढवळे, एस.डी. सुर्वे, आर.पी. गुंड, एस.व्ही. यादव, एस.आर. बनसोडे, एस.एस. गवळी, एम.ए. फुगे, एस के. ठोंगे आदींची गैरहजेरी लावण्यात आली.

 

• हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करून बाहेर गेलेल्या
लघु पाटबंधारेच्या एम.एम. बुधतराव, शेख एस.एस.
प्रतिनियुक्तीवर… एन.एस.कुटे, अपराजित रजेवर…पाणीपुरवठा विभागाचे एस.के. शेख, लघु पाटबंधारेचे डी. जी. वाघमारे, एकात्मिक बाल विकासचे गुरव बी.बी. फिरतीवर दाखवण्यात आले पण स्वाक्षरी नाही असे चव्हाण एन.एम., मिस्किन ए.एम., विस्तार अधिकारी बी.टी. रेपाळ व ए.आय. दुसऱ्या दिवशीची स्वाक्षरी आधीच केलेली होती.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामींचा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

कुर्डुवाडी पंचायत समिती येथे जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील गेले असता त्या ठिकाणी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी गट विकास अधिकारी यांना कोरोना झाल्याने ते रजेवर असल्याचे कळाले. त्यामुळेच खूपसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता इतके कर्मचारी कुठे गैरहजर असतात का…? असं कुठे शक्य आहे का..? उगीच बिनकामाचे फोन करू नका.. अशी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close