-->
करमाळासामाजिक

केम येथे रामायणाच्या सुंदर कांडातील ब्रह्मपत्र वाचन सोहळा ऊत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी/संजय जाधव

केम तालुका करमाळा येथील श्रीराम मंदिरामध्ये एकनाथी भावार्थ रामायणातील सुंदर काडांतील ब्रम्हपत्र वाचन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या निमीत्त सकाळी ८:०० वा. श्री भैरवनाथ व श्री प्रभु रामचंद्र यांना ह.भ.प. कोळी महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

 

दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यत भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ७:०० वाजता श्री रामायण ग्रंथाची पुजा श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते करून ब्रम्हपत्राचे वाचनाला सुरुवात झाली. हे वाचन सायंकाळी ७:०० ते सकाळी ६:०० पर्यत करण्यात आले. यामध्ये वाचक व सूचक यांची सेवा परंडा, कुर्डुवाडी, करमाळा व माढा या तालुक्यातील भाविकानी केली. या सोहळ्यासाठी भाविक रात्रभर उपस्थित होते.

 

या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. कोळी महाराज (मुंगशी) यांनी केले. या सोहळ्यासाठी श्री राम भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close