
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी येथे आज रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी माजी मंत्री, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब यांनी भेट दिली. मांगी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी मांगी येथील खंडोबा मंदिरासाठी सात लाख रुपयांचा निधी दिला.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरकार शेतकरी विरोधी आहे. तसेच कोणतेही निर्णय घेण्याची क्षमता या सरकार मध्ये नसल्याने लोकांच्या अनेक मागण्या प्रश्न प्रलंबित आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यास सरकार सक्षम नाही.
मुख्यमंत्री दर्शन देत नाहीत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दाखवा आणि १००० रुपये मिळवा अशी मिश्किल टिप्पणी ही सदाभाऊनी केली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे माझी नाळ या मातीशी जोडली असल्याने मी स्वतः ला कदापी मोठा समजत नाही. माझी भूमिका ही नेहमीच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. माझेकडे येणाऱ्या तळागाळातील सर्व सामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य काम आहे. माझेसारखें सर्व सामान्य माणसाला खासदार मंत्री होता आले. हे करमाळा माढा तालुक्यातील जनतेमुळेच घडू शकले. त्यामुळे मी आपल्याला कधी ही विसरू शकणार नाही. मी पाणी पुरवठा विभागाचा मंत्री असताना सर्वात जास्त निधी या दोन तालुक्याला उपलब्ध करून दिला असून यापुढे ही देणार आहे. असे आश्वासन सदाभाऊ खोत साहेबांनी दिले.
मांगी गावचे सुपुत्र मा. दिग्विजय बागल, सामाजिक कार्यकर्ते मा. सुजित तात्या बागल यांनी खोत साहेबाना मांगी तलावात कुकडीच्या पाण्याविषयी मागणी केली. त्यांनी लगेच शब्द दिला व पुढील आठवड्यात सुजित तात्या बागल यांनी कुकडी, मांगी तलाव संदर्भात कागदपत्र घेऊन मंत्रालयात यावं ही सूचना केली.
सदाभाऊ खोत साहेबांचे मांगी विषय खूप प्रेम असल्याचे यावरून स्पष्ट दिसले. मागील वर्षी दुःखद निधन झालेले रयत क्रांती संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते राज्य संघटक कै. रवींद्र बुवा तरटे यांचे घरी जाऊन त्यांचे कुटुंबाचे सांत्वन केले. रयत चे जिल्हा संघटक मांगी गावचे सुपुत्र श्री. अजय बागल यांनी पाठपुरावा करून गेल्या वर्षी मांगी ग्रामपंचायत पाणी पुरवठा साठी निधी ही उपलब्ध करून दिला होता आणि यावर्षी लगेच खंडोबा मंदिरा साठी ०७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे मांगी कर पण खोत साहेबांचे उपकार विसरणार नाहीत यात शंकाच नाही.
यावेळी मांगी ग्रामपंचायत सरपंच सौ. निर्मला (काकू) बागल, उपसरपंच नवनाथ बागल, ग्रा.पं. सदस्य तात्या शिंदे, ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी पप्पू शिंदे, लाला जाधव, नीलकंठ बागल, पद्माकर संचेती, पोलीस पाटील आकाश शिंदे, ग्रा. पं. शिपाई संजय सोनवणे, पुणे येथील उद्योजक अशोकसेठ नरसाळे, संभाजीराजे बागल, रयत क्रांतीचे सुदर्शन शेळके, शिवशंकर जगदाळे, राजाभाऊ बागल, पुरुषोतम नरसाळे, पंप्पू नरसाळे, हर्षद नरसाळे, मांगी येथिल गायक प्रविणकुमार अवचर, युवा नेते संतोष नरसाळे, उमेश बागल, ज्ञानदेव अवचर, राहुल देशमाने, आदेश बागल, किशोर बागल, महावीर नरसाळे, किसन शिंदे, तात्यासाहेब बागल, किरण बागल, विनोद नरसाळे यांचे सह मोठ्या संख्येने मांगी ग्रामस्थ उपस्थित होते.




