कोरेगाव भीमा व परिसरात मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांतीचा सण कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी ही महिला सोशल डिस्टनसिंग पाळत वर्षातील पहिला सण साजरा करत होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी वाण, तिळगुळ घेण्यासाठी लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. सकाळपासून महिला, नववधू व मुली साड्या नेसून गावातील देवतांना ओवसत होत्या.
कोरेगाव भीमाचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज देवस्थान, मारुती मंदिर, खंडोबा मंदिर, विविध चौकातील गणपती च्या मंदिरात ही महिलांची दिवसभर गर्दी होती. अनेक लहान थोर आपली परंपरा कायम राखत एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत तिळगुळ देत असल्याचे सर्रास चित्र सर्वकडे होते. कोरोनाच्या प्रमाणात काही ठिकाणी घट झाली असली तरी ही महिला वर्ग सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करत होते.




