-->
राजकियराज्य

PDCC बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदिपदादा कंद व सुनिल चांदेरे यांचा सत्कार

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

जिल्हा बँकेवर मिळालेली संधी अतिशय नम्रपणे स्विकारत शेतकरी, सहकारी उद्योग, पतसंस्था व नागरी बँका इत्यादींचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीपदादा विद्याधर कंद यांनी केले.

 

 

बाणेर येथील डाॅ. दिलीप मुरकुटे संस्थापक अध्यक्ष असलेल्या बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक पदी निवड झाल्या बद्दल सत्काराला उत्तर देताना कंद बोलत होते. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात प्रदिप कंद व सुनिल चांदेरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

यावेळी संस्थापक बाणेर नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष डाॅ. दिलीप मुरकुटे, चेअरमन विजय विधाते, व्हा. चेअरमन शशिकांत दर्शने, संचालक रामदास विधाते, माजी चेअरमन लहु सायकर, किसनराव बालवडकर, अतुल अवचर, संत तुकाराम सह. साखर कारखाना संचालक अंकुश उभे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमीत कंधारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुणे शहर नंदकुमार बिडवई, सहाय्यक व्यवस्थापक पी. डी. सी. सी. समीर रजपूत, पिरंगुट शाखा अध्यक्ष राम गायकवाड, राजु रोडगे, संजय ताम्हाणे, शिवराज बालवडकर, विनोद चाकणकर, बंडुशेठ मेंगडे, निघल सायकर, राहुल शिंदे, मेहबूब शेख, संतोष भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close