प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


प्रशासनाचा गाडा व्यवस्थित चालवून समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रशासकीय अधिकारी व पत्रकार यांनी मिळून काम केले पाहिजे. असे मत करमाळ्याचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त करमाळ्यातील सर्व पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम करमाळा नगरपालिकेच्या कार्यालयात करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, अशोक नरसाळे, जयंत दळवी, सिद्धार्थ वाघमारे, दिनेश मडके, सचिन जवेरी, नानासाहेब पठाडे, संजय शिंदे, सागर गायकवाड, लक्ष्मण भोसले, अविनाश जोशी, शंभूराजे फरतडे, अण्णा काळे, विशाल घोलप, नासीर कबीर, प्राध्यापक गोवर्धन चौरे आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांना काळे, अशोक मुरूमकर, नानासाहेब पठाडे व शंभूराजे फरतडे यांचा सत्कार मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी केला. यावेळी पुढे बोलताना बालाजी लोंढे म्हणाले की, पत्रकारांनी नगरपालिकेच्या संदर्भातील जनतेच्या नागरिकाच्या काही अडचणी असतील तर ते आमच्या पुढे मांडाव्यात त्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आमच्या चुका तुम्ही दाखवा पण चुका दाखवत असताना मी चांगल्या केलेल्या कामाचे कौतुक देखील आपल्या वृत्तपत्रातून करा.
यावेळी नगरपालिकेचे कार्यप्रमुख दिगंबर देशमुख, विनोद राखुंडे, ओंकार झाडबुके, फलके, प्रदीप शिंदे, आरोग्य निरीक्षक जब्बार खान, बांधकाम अभियंता गुरसाळे, शेख साहेब आदीजण उपस्थित होते.
करमाळा शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असून नगरपालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण शिवाय नगरपालिकेच्या मालकीच्या असलेले ओपन स्पेस भूखंड हे सर्व संरक्षित करण्याचे काम आपण करणार आहोत.
श्री. बालाजी लोंढे, मुख्याधिकारी, करमाळा नगरपालिका



