प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


पंजाबमधील फिरोजपूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत देशातील काँग्रेस नेतृत्वाच्या इशाऱ्यावर राज्यातील काँग्रेस सरकारने दुर्लक्ष करून मोठी चूक केली होती. परंतु, देवाच्या कृपेने पंतप्रधान या हल्ल्यातून सुखरूप वाचले. यापूर्वी सुरक्षेच्या त्रुटीमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेत केलेल्या निष्काळजीपणा व अक्षम्य गुन्ह्याबद्दल संपूर्ण देशात काँग्रेस व पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आदरणीय पंतप्रधानांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने महादेव मंदिर किल्ला विभाग येथे महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, अॅड. भगवान गिरी साहेब, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, विनोद महानवर, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके, अशोक मोरे, बापू तांबे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, शरद कोकीळ, गणेश गोसावी, विनोद इंदलकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




