प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण मोहिम कुंजीरवाडी आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले.
३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरवात झाली विद्यार्थ्यांनचे आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रात लसीकरण करण्याऐवजी त्यांना शाळेतच लस देण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून करण्यात आली होती आरोग्य विभागाने हि मागणी मान्य केली असून, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना काही शाळा जोडून दिल्या आहेत. शाळेमध्ये टप्याटयाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी जाऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण करत आहे. शाळांमध्ये लसीकरण होऊ लागल्याने लसीकरणाला वेग आला असे सांगण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंजीरवाडी येथील डॉक्टर मेहबूब लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिल्पा दलाल, प्राथमिक आरोग्य केंद्र थेऊर, डॉ. अनुराधा बोराडे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी, कविता लंबे स्टाफ नर्स, बागवान नर्स, आशा सेविका, प्रणिता मॅडम डाटा ऑपरेटर, राजेश जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी चिंतामणी विद्यामंदिर कनिष्ठ विद्यालय थेऊर मुख्याध्यापक श्री. बि.डी. नेवाळे, पर्यवेक्षक श्री. एम.जे. खरात, काटकर सर, जढर सर, गायकवाड सर, ननवरे सर, चौधरी सर, काकडे सर, कंद मॅडम, पठाण सर, भरीत सर,रोटे मॅडम, कानकाटे मॅडम, शिंदे सर, केदारी सर, सूर्यवंशी मॅडम, कोलते सर, कांचन सर, तांबे सर, लोंढे सर, भोसले सर, कुंजीर सर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.




