-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

पाथुर्डी येथे नववर्षानिमित्त छोट्या वसुंधरा दुतांकडून वृक्ष लागवडीसाठी श्रमदान

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील मौजे पाथुर्डी येथे शनिवार दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी नववर्षानिमित्त व माझी वसुंधरा अभियानांतर्गत “एक तास गावासाठी” या उपक्रमात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम छोटे वसुंधरा दूत यांच्याकडून करून घेण्यात आले.

 

आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाथुर्डी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या लहान मुलांना एकत्र करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण साठी खड्डे खोदण्याचे श्रमदान करून घेण्यात आले. मुलांकडून श्रमदान करून वृक्ष लागवड केलेल्या काही झाडांची आळी साफ करण्यात आली. लहानपाणीच मुलांवर निसर्ग संवर्धनचे संस्कार झाले पाहिजेत. लहानपनीच मुलांना प्रत्यक्षात वृक्षांचे महत्त्व समजले पाहिजे यासाठी त्यांच्याकडून प्रत्यक्ष कार्य करून घेतले असल्याचे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.

या वेळी पाथुर्डी गावचे सरपंच श्री. संतोष मोटे, मुख्याध्यापक महेश कांबळे, प्रशिक्षक चौगुले सर, उपशिक्षीका कविता कांबळे, सुरेखा चौरे मॅडम, विद्यार्थी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close