-->
करमाळाविशेषसामाजिक

अंदर मावळात पर्यटनाच्या नावाखाली होतय अवैध धर्मांतरण

बेथनी रिसोर्ट ख्रिश्चन धर्मांतराच बनलं होत हब; बजरंग दलाच्या दणक्याने धर्मांतरण झाले बंद

 

प्रतिनिधी/बाळा खांडभोर

अंदर मावळ मधील वडेश्वर ग्रामपंचायत च्या हद्दीत असणारे बेथनी रिसॉर्ट हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली गोर गरीब हिंदु कुटुंबातील मंडळींना पैशाच, आजार बरे करू अश्या विषयाचे अमिष दाखवुन धर्मांतरण करून घेतात.

नाताळ सणाच्या बहाण्याने अंदर मावळातील भोळ्या भाबड्या जनतेला भुलवून धर्मांतराचा घाट घातला गेला. या विषयाची पत्रक वाटत असताना स्थानिक पातळीवर गावकर्यांनी विरोध दाखवून या धर्मातर करणाऱ्या टोळीला हुसकावून लावले. या संदर्भात बेथनी रिसोर्ट चे मालक रिचर्ड स्वामिनाथन यांच्याशी संवाद साधला असता यांनी उडवा उडवीची उत्तर देत, अस काही होतच नाही अशी खोटी उत्तर दिली. या संदर्भात विश्व हिंदु परीषद, बजरंग दल च्या स्थानीक पदाधिकारी यांनी कार्यक्रम स्थळी पाहणी केली असता पैशाच्या लालसेने काही स्थानिक मंडळी धर्मांतराच्या या षड्यंत्राला पाठिशी घालू पाहत होती. कार्यक्रम स्थळी वेग वेगळ्या ठिकाणाहून पंढरपूर, नगर, निगडी, पुणे येथील गोर गरीब महिला, पुरुष यांना पैशाचं अमिष दाखवून, फिरायला जायचंय, तसेच वेगवेगळे आजार बरे होतील अशी खोटी आश्वासने सांगुन नाताळ निमित्त रिसॉर्टवर एकत्र केलं. आलेल्या लोकांकडून कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली की, आमचं या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी धर्मांतरण झालं आणि आम्ही आमच्या नातेवाईक मंडळींना या ठिकाणी धर्मांतरण करण्यासाठी आणले आहे.

हे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ व विश्व हिंदु परीषद बजरंग दलाच्या कार्यरत्यांनी रिसोर्ट चे मालक रिचर्ड स्वामिनाथन यांना चांगल्या भाषेत समज देत कार्यक्रम उधळून लावला व परत या भागात अश्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास समाज्याच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल अशा प्रकारे समज ही दिला.

या कार्यक्रमा संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांची कोणतीही परवानगी नसताना, कोरोनाचे नियम न पाळता २००० लोकांचा कार्यक्रम कसा होऊ शकतो, चर्चची नोंद नसताना पर्यटनाच्या नावाखाली असले उद्योग समाज खपवून घेणार नाही हा धर्मांतराचा उद्योग परत सुरू झाल्यास विश्व हिंदु परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा बजरंग दल जिल्हा संयोजक बाळासाहेब खांडभोर यांनी दिला व या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील असेही सांगितले.

या वेळी बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, सुशील वाडेकर, बाळासाहेब खांडभोर, निखिल भांग्रे, आकाश वारुळे, तानाजी असवले, बजरंग हिलम, मोरेश्वर पोपळे असे असंख्य बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close