श्री उत्तरेश्वर उच्च व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम (ता. करमाळा) येथे आज मंगळवार दि. ०६ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेचे दिवसभराचे कामकाज पाहिले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार केला. इयत्ता पाचवी ते दहावी मधील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निमित्त भाषणे केली. त्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी प्रेम व्यक्त केले. तसेच सुयश क्लासेस चे संस्थापक श्री. वसंत तळेकर सर व युवा सेनेचे जिल्हा समन्वयक श्री. सागर राजे तळेकर यांनी शिक्षकांचा सत्कार केला. श्री वसंत तळेकर सरांनी शिक्षकांविषयी प्रेम व्यक्त केले. शिक्षक कसा समाज घडवतात याची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. वाघमारे के.एन. सर यांनी केले. तर श्री. कोंडलकर पी. डी. सरांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. एस. बी. कदम सर, पर्यवेक्षक बी.व्ही. सांगवे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.



