-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

पुर्व भागातील वाड्यावस्त्यावरील सिंगल फेज तात्काळ सुरु करा – युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

पुर्वभागातील वीज पुरवठा पुर्णपणे खंडीत केल्याने नागरिकांसह मुक्या जणावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याच बरोबर पुर्वभागातील उसतोडणी साठी हजारो मजुर आलेले आहेत त्यांच्या देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन महावितरण ने पिण्याच्या पाण्यासाठी एक तासतरी वीज उपलब्ध करून द्यावी व वाड्यावस्त्यावरील सिंगल फेज तात्काळ सुरु करावी अशी आग्रही मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे  यांनी केली आहे.

या वेळी अधीक बोलताना फरतडे म्हणाले की पुर्व भागातील गौंडरे, आवाटी ,कोळगाव, निमगाव, हिवरे हिसरे मिरगव्हाण ‍ फिसरे या गावातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून अवघे चार तास वीज पुरवठा होत आहे या मुळे शेतकर्‍याकना अतोनात नुकसान सहन करावे लागले या गंभीर प्रश्नावर वीज महावितरण तसेच लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे .चार तास वीज पुरवठा होत असताना वीज बिल मात्र आठ तासाचे आकारण्यात येत आहे या अन्यायकारक बाबी कडे मात्र जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

वास्तविक2014 साली पुर्ण पणे बंद असलेला वीज पुरवठा व दोन वर्षांपासून चार तास वीज असलेल्याने या चार तासाचे वीज बिल माफ करून वीज बिल दुरुस्त करून देणे गरजेचे असून मागील काही महिन्यांपुर्वी वीजबिल वसुली साठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता त्यावेळी भरलेल्या बिलांच्या पावत्या देखील शेतकऱ्यांना दिल्या गेल्या नाहीत. याबाबत महावितरण ने खुलासा करावा अशी मागणी फरतडे यांनी केली आहे.

तसेच लवकरात लवकर आवाटी सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लावून आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा जेऊर महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा दिला आहे

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close