-->
करमाळासामाजिक

वडगाव द. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंबादास थोरात यांची निवड

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव (दक्षिण) येथे सोमवार दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणेसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी श्री. अंबादास भिकाजी थोरात यांची तर उपाध्यक्षपदी जुकेरा पैगंबर पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पालक सदस्य म्हणून भैरू देवराव कदम, आशा दिनेश गायकवाड, रेश्मा संपत पवार, नितीन नामदेव मुसळे, आशा परशुराम भोसले, सोनाली अजय अंधारे व सुनील मारुती पवार यांची निवड करण्यात आली. तर ग्रामपंचायत सदस्य सविता गहिनीनाथ रोडगे व शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून कल्याण सुरेश वाडेकर यांना घेण्यात आले.

 

 

 

सदर पालक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विज्ञान भिंत (सायन्स वॉल) चे उदघाटन करण्यात आले. तसेच नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

या निवडीच्या वेळी सरपंच श्री. बळीराम काळे, उपसरपंच अंकुश शिंदे, मुख्याध्यापक देवेंद्र जाधवर, शिक्षक शौकत मणेरी, बापूसाहेब दत्तात्रय गायकवाड, इब्राहिम पठाण, पैगंबर पठाण, परशुराम भोसले, अश्विनी थोरात, अश्विनी शिंदे आदी मान्यवर व पालक उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री. देवेन्द्र जाधवर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close