-->
करमाळासामाजिक

विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांची तपासणी

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

एक जानेवारी रोजी विजयस्तंभावर होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमासाठी सर्वच प्रशासना बरोबर आरोग्य विभाग देखील कंबर कसून तयारीला लागला आहे. नुकतेच पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पेरणे फाटा व परिसरातील हॉटेलांची तपासणी करून हॉटेल व्यावसायिकांना नियमावली चे वाटप करण्यात आले.

 

पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांनी परिसरातील हॉटेलची आरोग्य विषयक उपाययोजना उपक्रमाचे अंतर्गत ३२ हॉटेलांची पाहणी करत त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, कोविड लसीकरण, हॉटेल स्वच्छता यांची पाहणी करण्यात आली. यासाठी पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. प्रियांका सातव कोलते, आरोग्य निरीक्षण आणासाहेब कोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यीका विमल गव्हाणे, आशा गायकवाड, आरोग्य सेवक सचिन बुगे, बसवंत बहिरगोंडे आदींनी हॉटेलची तपासणी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close