
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरे येथील शाळेमध्ये नुकतीच पालकांची सभा पार पडली. पालकांच्या झालेल्या या सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. जोतीराम अशोक गाडे-पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ. आश्विनी दादा भगत यांची एकमताने निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठीची सभा कोरोना काळामुळे घेता येत नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सदरची मीटिंगला बहुसंख्य पालक उपस्थित होते. सभेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व समितीचे सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे सत्कार करण्यात आले. सत्कारानंतर सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष यांनी सर्व समिती सदस्य, विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक बंधू या सर्वांना विचारात घेऊन शाळेचा शैक्षणिक त्याचबरोबर विविधांगी विकास जास्तीत जास्त कसा होईल याकडे लक्ष देऊन व त्याबाबत आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण त्याबाबतचे प्रयत्न करू असे आश्वासित केले.
सदर निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी उपस्थित असलेले पालक श्री आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, कैलास गुटाळ, ज्ञानेश्वर गुटाळ, नागेश वडणे, दादा गुटाळ, सुधीर दोंड, बापू दोंड, वैभव पाटील, सतीश टेकाळे, विकास कदम, दादा भगत, रामभाऊ बारकुंड, दीपक पारेकर, शिराज मणेरी, विनायक उघडे, भिकाजी कोळी त्याच बरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव, श्री. शिंदे, श्री. घोगरे, श्री. राठोड आदींनी नूतन अध्यक्ष ज्योतिराम गाडे यांचे अभिनंदन केले.




