-->
करमाळासामाजिक

भोसे येथील प्राथमिक शाळेतील विज्ञान भिंतीचे शंकर घनवट यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

भोसे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विज्ञान भिंतीचे (सायन्स वॉल) उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष माननीय शंकर घनवट यांच्या हस्ते व गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडले.

 

 

 

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक शाळेत लोकवर्गणीतून विज्ञान भिंत (सायन्स वॉल) तयार करणे गरजेचे आहे. कारण शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुसज्ज असणे आवश्यक असून शाळेतील सायन्स वॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण होताना त्यांची जिज्ञासावृत्ती वाढीस लागते. तसेच लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानदृष्टी निर्माण होते. सदर उपक्रमामध्ये अनेक शास्त्रज्ञांचे फोटो तयार करून त्यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.

 

 

यावेळी सरपंच प्रा. डॉ. दिपक सुरवसे, उपसरपंच अमृता प्रीतम सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली भारत सुरवसे, तसेच प्रा. विजय रोडगे सर, उद्योजक प्रीतम सुरवसे, भारत सुरवसे आणि ग्रामसेवक राम बडे, ग्रामपंचायत शिपाई बापू पवार उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जाधव सर व सहकारी शिक्षक वीर सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले. तर आभार वीर सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close