-->
करमाळाविशेषसामाजिक

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव (ह.) शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी निवडी बिनविरोध झाल्या.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनुमंत राजाराम जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर, सिद्धेश्वर जगदाळे, कैलास गाडे, माधव भोसले, धनंजय निळ, संतोष जगताप, ज्ञानेश्वर नीळ, हनुमंत नीळ, भास्कर वायकुळे, गणेश निळ, चंद्रकांत साळुंके, सरपंच प्रतिनिधी नितीन जगताप, ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव(ह) या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज राज्यातील विविध ठिकाणी पोलीस, महसूल, शिक्षण, डॉक्टर, बँक, उद्योजक व व्यवसाय या क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असून चांगल्या प्रकारे काम करत आहेत,
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी असताना गावातील शाळेचा नावलौकिक तालुक्यात व्हावा, यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल, विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी योग्य पर्यंत हे अध्यक्ष नक्कीच पोहोचतील व पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करतील असा विश्वास शिव~संस्कार प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close