कौतुकास्पद: ‘या’ ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यारत्न जन्माचे स्वागत
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


वढू खुर्द, ता. हवेली ग्रामपंचायत च्या माध्यमातून कन्यारत्न जन्माचे स्वागत तसेच अपंग निधीचे वाटप वढू खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले. यासाठी एकूण ९ लाख ६० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप विद्यमान सरपंच मोहिनी सचिन भोंडवे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कन्यारत्न जन्माचे स्वागत या उपक्रमाचे अंतर्गत तब्बल २३ महिलांना १० हजार रुपये प्रमाणे ग्रामनिधीच्या माध्यमातून तसेच अपंग बांधवाना ५ टक्के प्रमाणे ३००००/- प्रत्येकी २४ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे निमित्ताने निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा, सामान्य ज्ञान स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. यात निबंध स्पर्धेत वैभवी काकडे, वक्तृत्व अभय चव्हाण, प्रश्नमंजुषा स्वराली वेदपाठक, सामान्य ज्ञान स्पर्धेत रोहन निकटे यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
यावेळी सरपंच मोहिनी सचिन भोंडवे, उपसरपंच सीमा भंडलकर, माजी सरपंच अनिल चोंधे, ग्रामपंचायत सदस्या रसिका चोंधे, महेंद्र खांदवे, कोमल धुळे, नवनाथ पवळे, रामदास भंडलकर, वंदना दरेकर, शंकर काकडे, उद्योजक सचिन भोंडवे, पोलीस पाटील मच्छिंद्र भोंडवे, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडू भोंडवे, ग्रामसेवक दादासाहेब नाथ, मुख्याध्यापक सुदर्शना शेलार, दत्तात्रय पवार, मीना म्हसे, विजय वणवे, कविता माकर, अंगणवाडी सेविका आशा पातोंड, आशा वर्कर अश्विनी भोंडवे आदी उपस्थित होते.




