-->
करमाळाराजकिय

वरकटणे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आ. संजय मामा शिंदे गटाचे नवनाथ देवकर विजयी

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्यातील वरकटणे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाचे, भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार श्री. नवनाथ गोकुळदास देवकर हे विजयी झाले आहेत. वरकटणे येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक लागली होती.

 

या पोटनिवडणुकीत एकुण २९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यापैकी विजयी उमेदवार श्री. नवनाथ गोकुळदास देवकर हे १४५ मते घेऊन विजयी झाले आहेत. पराभूत उमेदवार श्री. संतोष सुग्रीव देवकर यांना १३९ मते, तर नोटाला ११ मते झालेली आहेत.

 

 

वरकटणे येथील प्रभाग क्रमांक- २ मधील ग्रामपंचायत सदस्य, माजी गटसचिव स्व. गोकुळदास भगवान देवकर यांच्या आकस्मित निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत संजय मामा शिंदे गटाचे औदुंबर (आप्पा) देवकर व माजी आ. नारायण पाटील गटाचे श्री. अनिल कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार नवनाथ देवकर हे विजयी झाले आहेत.

 

 

यावेळी शिंदे व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच आप्पा देवकर, ॲड. प्रवीण देवकर, रणजीत देवकर, संजय तनपुरे, संतोष देवकर, जगन्नाथ मस्कर, शामराव देवकर, देशा सुकळे, संभाजी सुकळे, गणेश देवकर, अनिल मस्कर, समाधान मस्कर, भागवत तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, तानाजी तनपुरे, दत्ता देवकर आदींनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close