करमाळाकृषी विषयकसामाजिक
करमाळ्यात उद्यापासून तूर हमीभाव केंद्र सुरू होणार; सुजित तात्या बागल यांची माहिती
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मौजे मांगी येथील विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था यांचे वतीने खरीप हंगाम २०२१-२२ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत असून त्याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सुजित (तात्या) बागल यांनी केले आहे.

या योजनेत नाव नोंदणीसाठी शेतकरी तपशील फॉर्म, एक फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, सातबारा उतारा, पिक पेरा नोंदी सह व चालू असलेला मोबाईल नंबर देणे अपेक्षित आहे.
सदर नाव नोंदणीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेजारी मार्केट यार्ड करमाळा येथे श्री. आदिनाथ मोरे मो. नं. ९०११९७४११५ यांच्याशी संपर्क साधावा.




