
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


पिंपळे जगताप, ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयास सणसवाडी येथील फ्रॅंके फेबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने दोन संगणक संच व दोन लॅपटॉप संच भेट देण्यात आले असल्याची माहिती सेवाधाम मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी दिली.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथे मतीमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या सेवाधाम मतीमंद विद्यालयास सध्या संगणकाची अडचण निर्माण झालेली असताना फ्रॅंके फेबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सदर विद्यालयास दोन संगणक संच व दोन लॅपटॉप संच भेट देण्यात आले. यावेळी फ्रॅंके फेबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एच. आर. मॅनेजर मिलींद आहेर, उदय भोसले, अमित कुलकर्णी, मनोज तरटे, ऋषीकेश माने यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान सेवाधाम मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सेवाधामचे दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कार्य उल्लेखनीय असून भविष्यात देखील कंपनीच्या वतीने सदर विद्यालयास आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे फ्रॅंके फेबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एच आर मॅनेजर मिलींद आहेर यांनी सांगितले.




