-->
करमाळा

बिबट्या सदृश्य प्राण्याचा कुत्र्यावर हल्ला; तालुक्यात भीतीचे वातावरण

 

प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथे सोमवार दिनांक ०६ डिसेंबर रोजी रात्री बिबट्या सदृश्य प्राण्याने कुत्र्यावर हल्ला केला आहे. सदर हल्यात या प्राण्याने कुत्र्यांचं फक्त डोके ठेवून उर्वरित सर्व भाग खाल्लेला दिसत आहे. केम परिसरातील वडशिवणे येथे येथे हा प्रकार घडल्याने केम, कंदर, वडशिवणे, सातोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

वडशिवणे येथील परशुराम बारवकर हे सांयकाळी साडे सात वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतामधून गावाकडे येताना त्यांना बिबट्यासदृश्य प्राणी दिसला. त्यानतंर त्यांनी गावात येऊन हि माहिती गावकऱ्यांना दिली असता लगेचच गावातील २५ ते ४० तरूण हातामध्ये काट्या घेऊन त्या ठिकाणी गेले. पण त्यांना तिथे बिबट्या दिसला नाही. याच परिसरात सोमवारी रात्री किसन व्हरे यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर हल्ला केला असून त्या कुत्र्याच्या डोक्याचा भाग ठेवून उर्वरित सर्व भाग खाल्लेला दिसत आहे.

 

 

सकाळी टेंभुर्णी येथील वन अधिकारी यांनी वडशिवणे येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे घेऊन गेले. परंतु त्यांनी अजूनतरी काहीच कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यामुळे या परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ऊसतोड सुरू ऊसतोड कामगार हि घाबरायला लागले आहेत. वाडया वस्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तरी याचा वन अधिकारी यानी बंदोबस्त करावा असी मागणी सरपंच रत्नाकर कदम यानी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close