उत्तरेश्वर विद्यालयातील ‘या’ विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश
प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल उत्तरेश्वर विद्यालयातील शिक्षकांकडून या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात सन २०१९-२०२० मध्ये राज्य स्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत केम केंद्रातून कुमार पृथ्वीराज तळेकर याने प्रथम क्रंमाक मिळविला आहे. तर शाहिद झारेकरी या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी या प्रज्ञाशोध परिक्षेत प्रवीण्य मिळवत यश संपादन केले आहे.
याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम व्हि. डी. या विभागाचे प्रमुख मोमीन एस. एस, पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. उत्तरेश्वर विद्यालयाने मिळवलेल्या यशाबद्दल या संस्थेचे केम परिसरातील पालकानी विशेष कौतुक केले आहे.




