आंदोलनाला सत्याग्रहाच्या रुपाने जनआंदोलन बनवणाऱ्या आजच्या सरोजिनी नायडू….
लेखक:- आदर्श तायडे
(पत्रकार व सामजिक कार्यकर्ते)


सौ. निरजा आंबेरकर….काँग्रेसची नवं संजीवनी….
देशभरात काँग्रेस लयास जात असतानाच महाराष्ट्रात मात्र, काँग्रेसचे पुनरुत्थानाचे प्रयत्न दिसून येत आहेत. काँग्रेसला एक कार्यसम्राट आणि कार्यतत्पर प्रदेशाध्यक्ष लाभल्याने राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो आहे. २०१४ नंतर काँग्रेस जवळजवळ राजकारणातून नामशेष होते की काय..? अशी परिस्थिती असतानाच काही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आल्याने पुन्हा काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न आणि आशा पल्लवित झाल्या आहेत.
इतिहासात आंदोलनाला सत्याग्रहाच्या रुपाने जनआंदोलन बनवणाऱ्या सरोजनी नायडू प्रसिद्ध आहेत. परंतु, पुन्हा एकदा अशीच एक स्त्री मुरबाड मतदार संघात काँग्रेस साठी पुनरुत्थानाचे कार्य करत आहे. कार्यकर्त्यांची जोडणी असो किंवा नागरिकांचे मूलभूत प्रश्न, केंद्रातील बीजेपी सरकार चा निषेध असो वा देशविरोधी कृत्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत वा महिलांचे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांसाठी आंदोलन म्हटले की, पहिले नाव घेतले जाते ते म्हणजे सौ. नीरजा आंबेरकर. मुरबाड शहर व परिसरातील सर्व विषय व संदर्भ घेऊन एक स्त्री असूनही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक वर्ष आंदोलन नाही तर सत्यग्रहाच्या परंपरेनुसार मार्गी लावण्याचे काम निरजा आंबेरकर करत आहेत. अनेक वर्ष राजकरणात असल्याने सर्वांनाच सोबत घेत आपुलकीने विचारपूस करत कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी यांच्या सहकार्याने त्यांनी आजवर अनेक विषय हाताळले आहेत.
काँग्रेसी आंदोलनाला सत्याग्रहाच स्वरूप देऊन मुळ काँग्रेसी विचारसरणीचा अवलंब करावा असा त्यांचा आग्रह असतो. एक स्त्री इतक्या कुशल पने सर्वमान्य नेतृत्व होऊ शकते हे निरजा आंबेरकर यांनी सिद्ध केले आहे. साधा सरळ स्वभाव आणि दयाळू वृत्ती यासाठी त्या परिचित आहेत. राजकरणात असूनही अनेक समाजोपयोगी कार्य सतत करत राहणाऱ्या खऱ्या समाजसेविका त्या आहेत…… आजची काँग्रेसची नवं संजीवनी….
शहरात काँग्रेस नगण्य असताना पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यातून साकार झालेले आजचे कॉंग्रेसच जिवंत रूप याची मुळ प्रेरणा ही निरजा आंबेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून साकार झाली. समाजोपयोगी कार्य, राजकारणातील आंदोलन, आधारी सत्याग्रह या कृतीतून त्या २०२१ मधील काँग्रेसच्या सरोजनी नायडू भासतात….एक स्त्री तिची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून जेव्हा राजकारणात पुढे येऊ पाहते तेव्हा ही प्रचलित व्यवस्था तिला आडकाठी आणण्याचे प्रयत्न करते. परंतु, कोणत्याही पुरुष प्रधान संस्कृती ला व तिच्या निर्बंधांना बळी न पडता यशस्वी नेतृत्व करत निरजा आंबेरकर यांनी बदलापुरात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निरंतर पक्षाला आपल्याकडून काय देता येईल याचा विचार करणारी ही कार्यकर्ती खऱ्या अर्थाने काँग्रेसची नवसंजीवनी बनू पाहतेय…… आजतागायत एकही गैरव्यवहार वा अन्य कोणतेही गंभीर आरोप झाले नाही असे नेते खूपच कमी असतात…त्यातलच एक नाव म्हणजे, निरजा आंबेरकर…… येणार काळ काँग्रेस चा असे ठणकावून सांगताना त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली असते….
खरच अभिमान वाटतो मी एक बदलापूरकर असल्याचा…कारण माझ्या बदलापूर मध्ये तुमच्या सारखी एक नवं संजीवनी आहे….. thats why love my badlapur



