-->
करमाळासामाजिक

केम केंद्राची शिक्षण परिषद ‘या’ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

केम प्रतिनिधी/संजय जाधव

केम केंद्राची शिक्षण परिषद शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी केम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात संपन्न झाली. या परिषदेमध्ये केंद्र स्तरीय ”आदर्श शिक्षक पुरस्कार” व ”स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पुरस्कार” याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. अनिरुद्ध (अण्णा) कांबळे, पंचायत समितीचे सभापती अतुल (भाऊ) पाटील उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खालील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण करण्यात आले.
मच्छिंद्र नांगरे सर – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम, विष्णू काळे सर- नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम, रामदास काळे सर – जि.प. प्राथमिक शाळा फरतडे वस्ती (निंभोरे) तुकाराम तळेकर सर – जि.प.प्रा. केंद्र शाळा केम, अंगणवाडी सेविका अंजली लोखंडे – इंदिरानगर, मंगल पोकळे – तळेकर वस्ती नं-१

त्याचप्रमाणे आदर्श शाळा फरतडे वस्ती (निंभोरे) व राजाभाऊ तळेकर विद्यालय यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष व सभापती यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे शिक्षकांनी अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तसेच सर्व शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याविषयी आवाहन केले.

यावेळी उपस्थितांमध्ये केम गावचे उपसरपंच व शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर सर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज तळेकर सर, श्री उत्तरेश्वर हायस्कूलचे श्री. कोंडलकर सर त्याच बरोबर केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकामधून श्री. नांगरे सर, राणी सातव मॅडम व अंजलीताई लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख महेश कांबळे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश कळसाईत सर व आभार तुकाराम तळेकर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close