-->
करमाळाराजकियसामाजिक

‘या’ बँकेवर कारवाई करण्यासाठी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

केम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम येथे बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा असून या शाखेतून गरजू व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात नाही. याबाबतची चौकशी करून सदर बँकेवर कायदेशीर कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, केम येथे बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा आहे. या शाखेतून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या पिक कर्जाचे वाटप केले जात नाही. याबाबत बँकेमध्ये विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी व कर्मचारी नीट वागणूक न देता उडवा उडवीची उत्तरे देतात. सध्या शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी पैशाची अंत्यंत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आपली जमीन सावकाराकडे गहाण ठेवून त्यावर‌ कर्ज काढण्याची वेळ आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ‌ही शेतकऱ्यांची बँक समजली जाते. जर बळीराजालाच या बँकेतून कर्ज मिळत नसेल तर ती काय कामाची.

शेतकऱ्यांच्या पिक कर्ज देण्या संदर्भात महाराष्ट्र ‌राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्व बँकांना सख्त आदेश दिलेले असतानाही केम येथील बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकेवर कारवाई करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः लक्ष घालून सदर बँकेस पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्याचे ‌आदेश द्यावेत अशी मागणी अध्यक्ष कांबळे व शेतकऱ्यांमधून होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close