-->
आरोग्यकरमाळामहिलाविषयक

आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरा अन्यथा प्रजासत्ताकदिनी आंदोलन; शिवसेनेच्या वर्षाताई चव्हाण यांचा इशारा

 

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात. अन्यथा, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकून आंदोलन करू असा ईशारा करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम यांनी मा. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर साहेब यांना ई मेलव्दारे पाठवीलेल्या पत्रात दिला आहे.

 

 

 

या पत्रामध्ये त्यांनी असे म्हटले कि, करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव असून या गावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजारांच्या आसपास आहे. तसेच केम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत एकूण सोळा गावे आहेत. तसेच एकूण चार उपकेंद्र आहेत. यामध्ये कंदर, पांगरे, निंभोरे व घोटी या गावात उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात एकूण २२ मंजूर पदे असून त्यापैकी फक्त १० कार्यरत असून १२ जागा रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेवक ४, आरोग्य सहाय्यक १, औषध निर्माण अधिकारी १, कनिष्ठ लिपीक १, लॅब टेक्निशियन १, आरोग्य सेविका ४ अशी एकूण १२ पदे रिक्त आहेत.

 

 

 

आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. सर्वत्र कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. केम प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणचे कॅम्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. वाडया वस्तावर व केम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंर्तगत गावांमध्ये लसीकरण सुरू आहे.

रात्र दिवस आरोग्य कर्मचारी सेवा करीत आहे. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कर्मचाऱ्यावर ताण पडत आहे. कॅम्प सुरू असल्यावर दवाखान्यात साध्या गोळया, औषध देयला सुध्दा कर्मचारी उपलब्ध राहत नाही. केम प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० ओपीडि होतात. तसेच या आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेले एक वर्षापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तरी ही गाडि दुरूस्त करावी व आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत. अन्यथा २६ जानेवारी या दिवशी आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close