-->
राज्यसामाजिक

माझी वसुंधरा अभियाना” अंतर्गत मिरवडी येथे ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

प्रत्येक पाऊल हरिततेकडे, स्वछतेकडे नारा देत आपला परिसर स्वच्छ राहिला तरच आपले आरोग्य उत्तम आणि रोग विरहित राहील. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या वेळात वेळ काढून काही वेळ वृक्षारोपण व स्वच्छतेसाठी देणे ही काळाची गरज असल्याचे मत सरपंच सागर शेलार यांनी व्यक्त केले.

 

 

मिरवडी तालुका दौंड येथे “माझी वसुंधरा अभियाना” अंतर्गत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी वृक्षारोपण केलेल्या झाडांची आळे साफ करणे, गवत काढणे, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात आले.

 

 

 

यावेळी सरपंच सागर शेलार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे, चेअरमन बाळासाहेब शिंदे, महादेव भगत, संतोष भिशे, ऋषिकेश थोरात, तानाजी थोरात, विजय शेलार, सागर कांबळे, समीर भोसले, अभिजित धायगुडे तसेच इतर युवा सहकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close