केम प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत बाल संजीवनी अभियान कार्यक्रम संपन्न
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत बाल संजीवनी अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पालखे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. संतोष पालखे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे बाल मृत्यूचे दर कमी करणे हा आहे. आपल्या महाराष्ट्रात बाल मृत्यूचे दर अधिक आहे. हा कमी करण्यासाठी मुलाना लसीकरण करणे तसेच गरोदर माताना पौष्टिक आहार देणे, मातांची तपासणी अशा बाबीकडे लक्ष दिल्यास बाल मृत्यूचे दर कमी येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला लोकप्रतिनिधी शिवसेना महिला आघाडीच्या करमाळा तालुका अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम, आरोग्य सेविका श्रीमती बरगे, आरोग्य सेवक श्री. कावळे, आशा गट प्रवर्तक श्रीमती गोरे, अंगणवाडी सेविका अंजली ताई लोंखडे, अंगणवाडी मदतनीस, आशा कर्मचारी, गरोदर माता व बालके उपस्थित होती. या कार्यक्रमात गरोदर माताची तपासणी करण्यात आली. हे अभियान केम प्राथमिक केंद्राचे वतीने १६ नोव्हेंबर ते १० डिसेंबर अखेर या कालावधीत आयोजित केले आहे. अशी माहिती डॉ. संतोष पालखे यांनी दिली.




