केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाच्या मूर्तीची सजावट आज कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने पांडुरंगाच्या रूपात केली आहे. त्यामुळे आज भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त ऊत्तरेश्वराचे दर्शन पांडुरंगाच्या रूपात झाले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता आलेल्या भाविकाना येथेच पांडुरंगाचे दर्शन झाल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात दर सोमवारी वेगवेगळ्या रूपात देवाची सजावट केली जाते. ही सजावट गुरव भैय्या मोकाशी, गणेश गुरव, बाळासाहेब गुरव यांनी केली. यासाठी ऊत्तरेश्वर टोणपे, शुभम कंदरकर, केदार पळसकर, अमोल गलांडे यांनी परिश्रम घेतले.
या मंदिरात दर सोमवारी वेगवेगळ्या रूपात देवाची सजावट केली जाते. तसेच नेहमी प्रमाणे केम येथील चित्रकार शुभम वेदपाठक यानी मंदिरात भव्य अशी पांडूरंगाची रांगोळी काढली होती. पांडुरंगाच्या रूपातील उत्तरेशवर बाबांची मूर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. आज मंदिरातील रोषणाई मुळे मंदिरात भाविकांना प्रसन्न वाटत होते.



