-->
करमाळासामाजिक

वांगी येथील तरुणाचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम…

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील वांगी येथील युवक, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने, सामाजिक बांधिलकी जोपासत ऊसतोड मजुरांना किराणा किटचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

गोविंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी वांगी येथील ऊसतोडीचे काम करण्याऱ्या गरजू, होतकरु, गरीब महिला व पुरुषांना किराणा कीटचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी गोविंद देशमुख, तुषार साळुंखे, धवल देशमुख, अजिंक्य देशमुख, शुभम देशमुख, राकेश माने व मित्रपरिवार उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close