-->
मनोरंजनमहिलाविषयकराजकिय

एकात्मिक बालविकास सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस मेळावा संपन्न

शिवसरस्वती फाउंडेशन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयोजित होम मिनीस्टर कार्यक्रम संपन्न

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

एकात्मिक बालविकास सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मेळावा रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, सिन्नर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन शिवसरस्वती फाउंडेशन सोमठाणे व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर यांच्या समन्वयातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी करण्यात आले होते. हा मेळावा मा. जि.प. सदस्या सीमंतिनीताई कोकाटे व बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. गणेश सहाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

 

यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सदर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेवर आधारित आयसीडीएस दिनाचे औचित्य साधून स्वतःचा आनंद विविध कलाकृतींच्या सादरीकरणातून व्यक्त केला. यामध्ये पर्यवेक्षिकांनी सबला गीत व आयसीडीएस ध्येय गीत सादर केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सविता होलगडे मॅडम यांनी तर प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी गणेश सहाने साहेब यांनी केले.

 

यावेळी बोलताना श्री. सहाने साहेब यांनी १९७५ ते आत्तापर्यंत अंगणवाडी विभागाच्या रोपाचे महाकाय वृक्षात रूपांतर कसे झाले? आयसीडीएस विभागाचे एकंदरीत कामकाज कसे चालते? या विषयी माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. त्यानंतर सीमंतिनीताई कोकाटे यांनी अंगणवाडी सेविकांना आहार व आरोग्यावर मार्गदर्शन केलं. तसेच यापुढे अंगणवाडी सेविकांसाठी दरवर्षी असाच कार्यक्रम घेणार असल्याबाबत त्यांनी आश्वस्त केले.

 

या कार्यक्रमादरम्यान SAM व MAM मुलांना पौष्टिक आहार किटचेही वाटप करण्यात आले. होम मिनिस्टर कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. काही सेविकांनी संबळ नृत्य, एकपात्री नाटक सादर केले. कार्यक्रमाचे पूर्व नियोजन श्रीमती अर्चना गीते व इतर सर्व पर्यवेक्षिका यांनी केले. या कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close