-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

चापडगाव येथे कृषीदुतांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयातील कृषीदुत सागर कदम व श्रीकांत पवार यांनी चापडगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

कृषी जागरुकता आणी कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करून या मध्ये शेतीवर आधारित जोडधंदे,यांत्रिकीकरण, बिजप्रकिया, माती परीक्षण, आधुनिक सिंचन प्रणाली या सह आधुनिक शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच ज्वारी बियाण्यावर रासायनिक बीज प्रकिया या बद्दल प्रात्यक्षिक सादर केले.

या वेळी दत्तात्रय शिंदे ,सोमनाथ शिंदे मोहित शिंदे,काका शिंदे,पवन शिंदे,रोहित शिंदे ,अतुल शिंदे,अतुल कदम, सविता शिंदे,अनिता शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते

या उपक्रमास डाॅ आहिरे सर ,डाॅ अनारसे सर ,डाॅ चौधरी सर ,डाॅ सदाफळ सर आदिंचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close