-->
आरोग्यकरमाळासामाजिक

वडशिवणे येथील ‘या’ विद्यार्थ्याचे MBBS परिक्षेत यश; लवकरच होणार राज्यपालांच्या हस्ते सन्मान

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील भगवंत गणेश पवार या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रथम वर्ष एम. बी. बी. एस. परिक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. हैदराबाद येथे प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवणारा भगवंत हा महाराष्ट्र राज्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

भगवंतने वडशिवणे सारख्या छोट्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत पुढे गावातीलच अजित दादा पवार विदयालयात ई. १० मध्ये ९५.२० टक्के गुण मिळवून पास झाला. त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण सोनवणे काॅलेज ऊक्कडगाव येथे झाले. पुढे बारावीच्या बोर्ड परिक्षेत ९१.२३ टक्के गुण मिळवत २०२० च्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६४५ गुण मिळवून तो एम. बी. बी.एस. एमस ला प्रवेश पात्र ठरला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो. भगवंत पवार ने आत्तापर्यंत एकूण चार सुवर्ण पदक व एक सन्मानचिन्ह मिळवून इतिहास घडवला आहे. थोड्याच दिवसात एम्स हैदराबाद येथे होणाऱ्या मोठया समारंभात भगवंतला राज्यपालांचे हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भगवंतने मिळविलेल्या या यशाबद्दल केमचे सुपुत्र तहसिलदार विजय तळेकर, करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे साहेब, गोसेवक परमेश्वर तळेकर, कृषी सहायक दादा पवार, माजी सरपंच किंग मेकर अजितदादा तळेकर, कंदर केंद्र प्रमुख साईनाथ देवकर, केम केद्र प्रमुख महेश कांबळे, डाॅ. अंकुश तळेकर, सचिन बिचीतकर, डॉ. संतोष पालखे, पत्रकार संजय जाधव, मुख्याध्यापक भिमराव भोसले, पोलीस काॅन्सटेबल देवकर साहेब यानी अभिनंदन केले आहे. त्याचे करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close