प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


केम येथील युवा कार्यकर्ते दत्तात्रय हरिदास तळेकर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा. गणेश भाऊ चिवटे यांनी तळेकर यांची करमाळा तालुका उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे.
यावेळी बोलताना दत्तात्रय तळेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची ध्येय, धोरणे तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात मी करणार आहे. सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या केंद्र स्तरावरील सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम गणेश भाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात केले जाईल.
यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अमोल पवार, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, आजिनाथ सुरवसे, केम शहराध्यक्ष गणेश तळेकर, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, ओबीसी तालुका सरचिटणीस भैय्याराजे गोसावी, युवा वॉरियर्स तालुका सहसंयोजक सागर नागटिळक, दादासाहेब काळे, भिवा जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




