-->
करमाळाराजकियराज्यसामाजिक

आ.संजयमामा शिंदे यांचा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

गेली तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या आंदोलनाला करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी लाखो एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहेत. महाराष्ट्र शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणेबाबत एसटी कामगारांची मागणी असून त्यांच्यामध्ये आक्रोश व उदासीनता निर्माण झालेली आहे. अनेक एसटी कामगार आजतागायत तुटपुंज्या पगारामुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यांचेकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही दुसरे साधन नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून महाराष्ट्रातील २९ कर्मचाऱ्यांना त्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

एसटी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी पुकारलेल्या संपाला मी जाहीर पाठिंबा देत आहे.

या पाठिंब्याचे पत्र आमदार संजयमामा शिंदे यांच्या वतीने करमाळा आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यकर्ते श्री. तानाजी बापू झोळ, पं. स. सदस्य ॲड. राहुल सावंत, नगरसेवक श्री. प्रविण जाधव, पं. स. सदस्य दत्ताभाऊ जाधव, माजी सरपंच मानसिंग भैय्या खंडागळे, सरपंच आशिष भैया गायकवाड, आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, पोफळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख यांचे उपस्थितीत देण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close