-->
करमाळामहिलाविषयकराजकियसामाजिक

करमाळा शिवसेना महिला आघाडीकडून ‘या’ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

केम-रोपळे या रस्त्याची दूरावस्था झालेली असून या रस्त्याची लवकर दुरूस्ती करावी. अन्यथा करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथील अभियंता साहेब यांना ई-मेल व्दारे पाठवलेला पत्रात दिला आहे.

 

 

त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, केम-रोपळे हा रस्ता करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील रोपळे या गावाला जोडतो. तसेच या रस्तावरून मुंगशी मार्गे पंराडा, बार्शीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. सध्या या रस्त्याची अत्यंत दूरावस्था झाली असून या रस्त्यात खड्डा का खड्डयात रस्ता आहे हेच समजत नाही. या रस्त्यावर जागो-जागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकाना या रस्यावरून गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे यावर लहान मोठे अपघात झाले आहेत.

 

 

सध्या तर या रस्त्यावरून ऊस वाहतूक सुरू आहे. रात्री या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना आपला जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर चालवावा लागत आहे. तसेच एखाद्या आजारी पेंशटला कुर्डुवाडी किंवा बार्शी येथील दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली तर याच रस्त्यावरून जावे लागते. केम येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याच रस्त्यावरून सायकलवर ये-जा करावी लागते. विद्यार्थ्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे वांरवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. तरी या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close