-->
करमाळाराजकियराज्य

भविष्यकाळ आपल्यासाठी चांगला असेल; रासपच्या आढावा बैठकीत महादेव जानकर यांचे प्रतिपादन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

“जिसकी संख्या भारी, ऊसकी उतनी भागिदारी” या धोरणानुसार राष्ट्रातील सर्व समाजाला सोबत घेऊनच राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरू असून पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे. रासपचा मुख्यमंत्री, पंतप्रधान कसा होईल हे आमचे ध्येय, धोरण आहे. आम्हाला विचारल्या शिवाय पुढचा मुख्यमंत्री बनणार नाही असा बंदोबस्त करू. असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाच्या करमाळा येथील आढावा बैठकीत महादेव जानकर यांनी केले. या प्रसंगी राज्याचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रभारी परमेश्वर पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनीही रासप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले की, मी मंत्री असताना सर्वाधिक दूधाला दर दिला. आपण कष्ट करतो आणि फळं दूसरेच खातात. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहीजेत. त्यासाठी वन बुथ टेन युथ ची संकल्पना घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेसाठी प्रभारी, गट-गण प्रमुखांची नेमणूक करावी. सर्व समाजाला सोबत घेऊन गावागावात कार्यकर्ता जोडला पाहीजे. राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. गाव तीथं शाखा तसेच विविध प्रकारच्या सर्व आघाड्या स्थापन कराव्यात.

 

काँग्रेस, भाजपची धोरणे वेगळी आहेत. आमदार, खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे, हे त्यांचे धोरण आहे. ते जास्त काळ टिकणार नाही. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. आपला रस्ता मात्र फार वेगळा असून रासपचे आज दोन आमदार आहेत तर उद्या २५ होतील. काही खासदार होतील. आज रासपची ताकद वाढत आहे. रासपचाच पंतप्रधान होईल. त्यासाठी मला कुणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल, असंही जानकर म्हणाले.

माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार करमाळा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. करमाळा तालुकाध्यक्ष पदी जिवन होगले, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे व राजू ठोंबरे, महिला तालुका अध्यक्ष शारदा सुतार, अल्पसंख्याक अध्यक्षपदी जहाॅगीर पठाण यांची तर पांडे जिल्हा परिषद गट प्रमुखपदी आप्पा पांढरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे, प्रभारी परमेश्वर पुजारी, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, जेष्ठ नेते चंद्रकांत खताळ, बाळासाहेब टकले, इंजि. प्रकाश कोळेकर, विधानसभा अध्यक्ष शंकर सुळ, माजी तालुकाध्यक्ष भैरू सलगर, जहाॅगीर पठाण, राजू ठोंबरे, प्रशांत शिंदे, जगन्नाथ सलगर, अविन पाटील, चंद्रशेखर पाटील, डाॅ. भाग्यवंत बंडगर, शहाजी धेंडे, प्रविण होगले, रावसाहेब बिनवडे, विठ्ठल खांडेकर, रघूवीर खटके, विठ्ठल भिसे, शंकर राऊत, राजेंद्र जाधव, राहूल वायकुळे, विकास मेरगळ, दादा ननवरे, नानासाहेब खताळ, दादा खोमणे, शिवाजी पवार, दिपक कडू आदी रासप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close