-->
करमाळाविशेष

केेम केंद्राची शिक्षण परिषद निंभोरे येथील जि.प. शाळेत उत्साहात संपन्न

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

माहे ऑक्टोबर २०२१ मधील केम केंद्राची आँफलाईन शिक्षण परिषद कोरोना बाबतचे सर्व शासकीय नियम पाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फरतडे वस्ती, निंभोरे या ठिकाणी आयोजित केली होती. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कांबळे साहेब व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

 

माहे ऑक्टोबर २०२१ च्या शिक्षण परिषदे मध्ये प्रास्ताविक श्री. अरुण चौगुले सर यांनी केले. श्रीमती सातव मॅडम, श्री. काळे सर, श्री. माने सर यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ शाळा सुंदर शाळा याबाबत श्री. चौगुले सर यांनी माहिती व अनुभव सांगितले. यावेळी निंभोरे गावातील कु. यश वाघमारे यांची नवोदय विद्यालय येथे निवड झाल्याबद्दल केंद्रप्रमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ शाळा सुंदर शाळा मध्ये सुंदर कामे करून प्रथम क्रमांक आल्याबद्दल फरतडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. चौगुले सर आणि श्री. काळे सर यांचा सन्मान करण्यात आला. निसर्गाच्या परिसरात शिक्षण परिषद झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारे विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी आभार श्री. तुकाराम तळेकर सर यांनी मानले. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या संकल्पनेला ही शाळा ऊतरली आहे. या शाळेची रंग रंगोटीचे काम येथील शाळेचे मुख्याध्यापक अरूण चौगुले व काळे गुरूजी यानी स्वखर्चाने केली आहेत. विशेष म्हणजे या शाळेची रंग रांगोटीचे काम या शाळेतील शिक्षकांनी स्वतः केले आहे. म्हणूनच, ही शाळा सर्वाना पाहण्यासाठी केम केंद्रचे कर्तव्य दक्ष केंद्र प्रमुख महेश कांबळे सर यांनी या वर्षातील शिक्षण परिषद जि. प. प्रा. शाळा फरतडे वस्ती, निंभोरे येथे घेण्यात आली. हि शाळा पाहून इतर माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी विशेष कौतूक केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close